Go Top
Home / About Us
Founder's Message

Education is the manifestation of of perfection already in man - Swami Vivekanand


शिक्षण शेत्रात व्यापक परिवर्तनाची आवश्यकता असल्याचे लक्षात येवून जळगाव जिल्ह्यात सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ.अविनाश आचार्यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने व्यापक विचार मंथनातून विवेकानंद प्रतिष्ठान या शैक्षणिक प्रकल्पाचा उदय झाला.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ज्यात मेरीटचा अनाठायी आग्रह नाही, अनौपचारिक शिक्षणावर भरी यासाठी विशेष प्रयत्न, निर्मिती क्षमता जोपासण्याची स्वतंत्र व्यवस्था त्यांनी निर्माण केली. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, श्रमसंस्कार, सामाजिक दायित्व, राष्ट्रभक्ती, चारित्र्य, संपन्नता, खिलाडू वृत्ती, रचनात्मक दृष्टीकोन, सृजनशीलता, असे विविध आयाम विकसित करणे. राष्ट्रसमर्पित युवापिढी घडवणे असा व्यापक दृष्टीकोन प्रतिष्ठानच्या स्थापनेत आहे.स्वामी विवेकानंदांच्या मते मनुष्यत्व निर्माण करणे हेच शिक्षणाचे मुख्य कार्य होय.बालक स्वत:च स्वत:चा गुरु असतो. आपण त्याचा वाढीस मदत मात्र करू शकतो. शिक्षणाचे खरे सार आहे मनाची एकाग्रता. एकाग्रता हीच ज्ञान भांडार उघडू शकणारी एकमेव गुरुकिल्ली शील बनवणारे शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारे शिक्षण मातृभाषेतूनच हवे गुरु आणि शिष्य ह्या दोघांच्या बाबतीत काही गोष्टी आवश्यक आहेत. शिष्याच्या बाबतीत पावित्र्य, ज्ञानोपाजनाची खरी तृष्णा व चिकाटी हे गुण आवश्यक होय. शिक्षक चारित्र्यसंपन्न, पापशुन्य, त्यागी शास्त्राचे मर्म अवगत असणारा हवा. प्रत्यक्ष आणि अनुभव योग्य अशा प्रभावाच्या रूपाने गुरूची शक्ती शिष्यात संक्रमित होत असते. धर्म हा शिक्षणाचा गाभा होय. आपल्याला आज अशा शिक्षणाची गरज आहे कि ज्याने शील बनते, मानसिक शक्ती वाढतात, बुद्धी चौफेर व विशाल होते आणि ज्यायोगे मनुष्य आपल्याच पायावर उभा राहू शकतो.


       शिक्षणातून जीवन सुधारले पाहिजे, व्यक्तिविकास झाला पाहिजे, बुद्धीचा विकास होऊन सद्विचारांचा परिणाम शील संवर्धनात होणे म्हणजेच खरे शिक्षण!

डॉ. अविनाश रामचंद्र आचार्य - संस्थापक